जुनी पेन्शन हीच भेट म्हणून ओवाळणी द्या! | पुढारी

जुनी पेन्शन हीच भेट म्हणून ओवाळणी द्या!

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना नाकारुन नवीन पेन्शन योजना लागू केली. मात्र, या नवीन पेन्शन योजनेमुळे मृत कर्मचार्‍यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत. राखी पौर्णिमेची भेट म्हणून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गेल्या पाच वर्षांपासून कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी आंदोलने करीत आहे. मात्र, शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मृत कुटुंबातील सदस्यांना तरी ही जुनी पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने ज्योती कलुबर्मे, यास्मिन मुलाणी, स्मिता घुले, कविता खंदारे, स्वाती नलावडे, दीपाली स्वामी, जयश्री मेलगे-पाटील, स्नेहल जाधव, सारिका राख, माधुरी दुरुगकर, शुभांगी पवार, प्रीती कांबळे, वैशाली कोरे, तावसकर, दुर्गादेवी उराट, गायत्री काळे, रूपाली आसबे, स्मिता शिंदे, शुभांगी सुरवसे, माधुरी पुजारी, सुलभा काळे, हेमलता सोनवणे, शमा शेख, प्रीती वडवेराव यांनी याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

Back to top button