सोलापूर : मामानेच भाच्याचे अपहरण करून खून केल्याचे उघड | पुढारी

सोलापूर : मामानेच भाच्याचे अपहरण करून खून केल्याचे उघड

अक्कलकोट ; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात करणाने कट रचून मामानेच भाच्याचा अपहरण करून जीवे ठार मारल्याच्या घटनेची उकल तब्बल 10 महिन्यांनी करण्यात अक्कलकोट दक्षिण पोलीसांना यश आले आहे. विशेष म्हणजे यात घटनेतील मुख्य सूत्रधार एक पोलीसचंं असल्याची चर्चा आहे.

अभिषेक श्रीमंत राठोड (वय 21 रा. झापू तांडा बोरोटी बु. ता. अक्कलकोट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीसात 5 जणांविरोधात अज्ञात कारणाने कट रचून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेताची विल्हेवाट लावल्याबाबत विठ्ठल मानसिंग चव्हाण (वय 31), मोताबाई मानसिंग चव्हाण, बहाद्दुर मानसिंग चव्हाण (वय 42), विकास प्रकाश राठोड (वय 25 रा. शाबाद जिल्हा गुलबर्गा), सुनिता सुरेश व्हनकेरी (32 रा. सोलापूर) गणेश व्यंकेटेश राठोड (वय 19 रा. तांदुळवाडी, ता. बरामती जिल्हा पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

अक्कलकोट दक्षिण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीसात प्रारंभी मयत युवक अभिषेक श्रीमंत राठोड याची बेपत्ता म्हणून अक्कलकोट दक्षिण पोलीसात 11 नोव्हेंबर 2021 रोजी घटनेची नोंद आहे. प्रेमदास श्रीमंत राठोड (वय 22 रा. बोरोटी बु. ता. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली होती.

यातील गुन्ह्यातील तपासामध्ये आरोपी विकास प्रकाश राठोड यांनी तपासामध्ये घटनेतील स्थळ दाखवून तपासात माहिती दिली. सदर घटना स्थळी शेतामध्ये प्रेत पुरून ठेवलेले स्थळ दाखवल्यावर पंचनामा करून प्रेत काढण्यात आले. या गंभीर गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. पो.नि. प्रदीप काळे, ए. पी. आय. बी. आर काकडे, पो.स.ई. सिद्राम धायगुडे, पो.हे. कॉ. अजय भोसले, पो.ना. अलताफ शेख, नबिलाल मियॉवाले, पो.ना. जगदिश राठोड, सुभाष दासरे यानीं या गंभीर गुन्ह्याबाबत कुठल्या ही धागादोर्‍याची माहिती नसताना घटनेची उकल करण्यात यश मिळविले.

Back to top button