पंढरपूर : तावशीत चेंडू लागून तरुणाचा मृत्यू | पुढारी

पंढरपूर : तावशीत चेंडू लागून तरुणाचा मृत्यू

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा तावशी (ता. पंढरपूर) येथील माण नदीच्या पात्रातील क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेंडूचा फटका बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम गणेश क्षीरसागर (वय35) रा. नेपतगाव असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना शनिवार दि. 6 ऑगस्ट रोजी घडली आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तावशी येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विक्रम क्षीरसागर या केलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता.

विक्रम या स्पर्धेत नेपतगावच्या संघासाठी क्रिकेटचा सामना खेळत होता. परंतु, सामना खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका बसला. त्यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारादरम्यान विक्रमचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रमच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहिण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Back to top button