‘गुंठेवारी’साठी एक लाख सह्यांची मोहीम | पुढारी

‘गुंठेवारी’साठी एक लाख सह्यांची मोहीम

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा शहरातील गुंठेवारी खरेदी – विक्री सुरू होण्यासाठी शासनाला एक लाख सह्यांचे निवेदन देण्यासाठीच्या मोहिमेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. हद्दवाढ विकास समितीतर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे. सैफुल येथे या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी हद्दवाढ विकास रथाचे पूजन कुमार स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हद्दवाढ विकास समितीचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर म्हणाले, गुंठेवारी खरेदी – विक्री बंद असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गरजेच्यावेळी जागेची खरेदी – विक्री करता येत नसल्यामुळे मोठ्या समस्या उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणून हद्दवाढ भागातील एक लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.

शहरातील गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी हद्दवाढ भागातील विविध चौकांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या माध्यमातून जुळे सोलापूर, नीलम नगर, सोरेगाव, हत्तुरे वस्ती, रचना सोसायटी, प्रसाद नगर, मीना नगर, रोहिणी नगर, आर्य चाणक्य नगर, स्वामी विवेकानंद नगर, सुभाष नगर, स्वागत नगर, केंगनाळकर नगर, सिद्धेश्वर नगर, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा नगर, आदर्श नगर, अनिता नगर आदी परिसरातील एक लाख नागरिकांच्या सह्या घेण्यात येणार आहेत. 13 ऑगस्टपर्यंत सह्यांची मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीदिनी निवेदन देण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष श्री. केंगनाळकर यावेळी म्हणाले.

यावेळी विकास समितीचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर, राधाकृष्ण पाटील, मनोजकुमार अलकुंटे, सुधाकर व्हनमाने, बसवराज केंगनाळकर, प्रवीण ढेपे, साबीर इनामदार, भीमाशंकर बिराजदार, गोरख राठोड, दर्याप्पा खडाखडे, दाजीबा दासाडे, जागिर मुल्ला, सैपन इनामदार, अजित नाईक, लक्ष्मीकांत बिराजदार, संतोष माळी, सचिन चौगुले, शिवा बंगले, सिध्दाराम कुटेकर, अप्पु यलशेट्टी, सिध्देश्वर बिराजदार, विजयकुमार बिराजदार आदी उपस्थित होते. सुरेश नेरुले यांनी आभार प्रदर्शन केले.

Back to top button