नागरिकांनी घरावर, व्यापार्‍यांनी दुकानांवर तिरंगा झेंडा लावावा | पुढारी

नागरिकांनी घरावर, व्यापार्‍यांनी दुकानांवर तिरंगा झेंडा लावावा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा पंढरपूर शहरातील प्रत्येक नागरिक, व्यापारी, महाविद्यालय, प्राथमिक शाळेतील प्रत्येकाने आपल्या घरावर, दुकानावर तिरंगी झेंडा लावून पंढरपूर शहर हे तिरंगामय करावं, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, लायस क्लबचे अध्यक्ष रा.पा. कटेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर निकते. माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरातील बचत गट,सामजिक संघटना, व्यापारी संघटना पदाधिकारी यांची बैठक नगरपालिका सभागृहात संपन्न झाली.

पुढे बोलताना माळी म्हणाले की, शहरातील सर्व महिला बचत गट यांनी नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून द्यावेत व ध्वज विक्रीसाठी महिला बचत गट यांना नगरपरिषदेच्या वतीने स्टॉल साठी जागाही उपलब्ध करून दिली जाईल व प्रत्येक महिला बचत गटाच्या प्रतिनिधी यांनी आपल्या आपल्या भागात प्रत्येक घरावर झेंडा लावण्याबाबत जागृती करावी, असे सांगितले. या बैठकीत सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी व्यापारी संघाचे प्रमुख सोमनाथ डोंबे, विजय परदेशी, संतोष भिंगे, प्रिन्स गांधी, राजू भट्टड, सतीश लिगाडे, नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, एन यु एल एम चे संतोष कसबे, योगेश काळे,उमेश कोटगिरी तसेच शहर महिला बचत गटाच्या प्रमुख राणी गायकवाड, श्रीमती वैशाली माने, सुजाता राऊत, वंदना बिडकर सर्व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी लायन्स क्लब, रोटरी क्लब, व्यापारी संघटना यांनी प्रत्येकी 500 झेंडे देण्याची मान्य केले तसेच पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना व कर्मचार्‍यांच्या वतीने प्रत्येक कर्मचारी यांच्या वतीने पाच झेंडे असे 2500 झेंडे देण्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व आभार उपमुख्याधिकारी अ‍ॅड. सुनील वाळूजकर यांनी मानले.

Back to top button