
सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापुरातील महिला उद्योजिकेची केंद्र सरकारच्या कर योजनेतून मिळणार्या 2 कोटी 14 लाख 87 हजार रुपये 480 रुपयांच्या e-scrips वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दिली, गुजरात, उत्तर प्रदेशातील संशयितांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोलापुरातील महिला उद्योजिका ज्योती सुनील सारडा (वय 47, रा. होमकरनगर, भवानी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय प्रसाद ताटे (रा. घर नं. 94, चांदपूर, पश्चिम दिल्ली, दिल्ली), गणेश मिलसिंग गिरासे (रा. शॉप नं. 5, प्लॅटिनियम प्लाझा, सारधना जकात नाका, सुरत, गुजरात), विकास रमेशचंद (रा. 329, पॉकेअ 1, पासिंग पुरी, पश्चिम विहार, दिल्ली), काकडिया ब्रिजेशकुमार विनोदभाई (रा. प्लॉट नं. 291, श्री नारायण सोसायटी, कटारगम, सिनगानपोरी रोड, सुरत सिटी, कटारगम, सुरत, गुजरात), रौनक प्रकाश गुप्ता (रा. 9/106, एस आर. बिल्डींग, महावीर गंज, अलिघर, उत्तर प्रदेश) व इतर अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली येथील धनंजय प्रसाद ताटे, सुरत येथील गणेश मिलसिंग गिरासे, दिल्ली येथील विकास रमेशचंद, सुरत येथील काकडिया ब्रिजेशकुमार विनोदभाई, उत्तर प्रदेशातील रौनक प्रकाश गुप्ता व इतर अज्ञात लोकांनी 1 जानेवारी 2021 ते 5 फेबु्रवारी 2022 या कालावधीत अक्कलकोट रोड एस थ्री इंटरनॅशनल येथे ज्योती सारडा यांच्या नावाने बनावट दस्तऐवज, डिजीटल सिग्नेचरसह सर्टीफिकेट खोटे बनविले. हे सर्टिफिकेट खरे आहे असे भासवून पोर्टलवर नोंदणी करून त्याद्वारे e-scrips ची ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी ज्योती सारडा यांची कागदपत्रं उपयोगात आणली.
सारडा यांच्या कागदपत्रांचा उपयोग करून Rebate of state and central taxes and leveis (ROSCTL) या शासकीय योजनेतून मिळणार्या 2 कोटी 14 लाख 87 हजार 470 रुपयांचा श-ीलीळिी स्वतःच्या फायद्यासाठी जाणूनबुजून सारडा यांची संमती नसताना वापरून फसवणुक केली. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट पुढील तपास करीत आहेत.