सोलापूर : एम. ए. कॅपिटल बारमधील डान्सबारवर पोेलिसांचा छापा | पुढारी

सोलापूर : एम. ए. कॅपिटल बारमधील डान्सबारवर पोेलिसांचा छापा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा तुळजापूर रोडवरील हगलूर येथील एम. कॅपिटल बारमध्ये चालणार्‍या बेकायदेशीर डान्स बारवर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 6 महिलांसह 28 जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टिम, कुलर, लॅपटॉप, लाईट सिस्टिम, मद्याचा साठा, 15 दुचाकी असा 14 लाख 46 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

एम. ए. कॅपिटल रेस्टॉरंट अँड बारचे मालक महादेव लक्ष्मण आनंदकर (रा. भवानी पेठ, सोलापूर), मॅनेजर शुभम महादेव आनंदकर (रा. भवानी पेठ, सोलापूर), अक्षय महादेव गिराम (वय 27, रा. 85 भवानी पेठ, सोलापूर) अनिल विठ्ठल इडागोटे (वय 27, रा. मड्डी वस्ती, सोलापूर), पिंटू चितळप्पा साळुंखे (वय 28, रा. रविवार पेठ, वडार गल्ली, सोलापूर) विलास चंद्रकांत वल्लाल (वय 44, रा. 34 न्यु पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर), दिपक दर्गय्या बोडा (वय 43, रा. जुना विडी घरकुल, सोलापूर), बन्टे भाऊसाहेब थोबडे (वय 31, रा. बाळीवेस, सोलापूर), मोहम्मद नुरमोहम्मद सुमरो खत्री (वय 24, रा. बलोत्रा, तहसिल पचपदरा, जि. बाडमेर, राजस्थान), वैभव लक्ष्मण फाळके (वय 32, रा. पापय्या तालीम, जुनी मिल कंम्पौड, सोलापूर), विक्रम रणजित सेनी (वय 28, रा. चिराणा, तहसिल नवलगंड, जि. जूनजूनू, राजस्थान), अर्जुन मरगू विटकर (वय 28, रा. जुना तुळजापूर नाका, सोलापूर), जया गुरुवा सफालीगा (रा. निनजूर, कारकला, निंनजूर, उडपी, कर्नाटक), वॉचमन संतोष शिवाजी घंटे (वय 34, रा. मित्र नगर, दहिटणे, सोलापूर), पैसे गोळा करणारा कुमार शंकर आलुरे (वय 21, रा. एकता नगर, वालचंद कॉलेजजवळ, सोलापूर), वेटर विकास पांडुरंग राठोड (वय 35, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर), आचारी राहुल भिमा जाधव (वय 31, रा. सैफुल, विजापूर रोड, सोलापूर), बाऊन्सर अमित काशिनाथ सुवे (वय 38, रा. बुधवार पेठ, सोलापूर), बाऊन्सर महेश वसंत गायकवाड (वय 32, रा. देगाव, भिमा चौक, सोलापूर), बाऊन्सर विजय चंद्रकांत कळसे (वय 32, रा. उळेगाव, ता. दक्षिण सोलापूर), बाऊन्सर धम्मसागर अनिल मस्के (वय 32, रा. न्यु बुधवार पेठ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान ,यामधील अटक केलेल्यांना जामिनावर सोडून देण्यात आले.

सोलापूर-तुळजापूर रोडवरील हगलूर येथील एम. ए. कॅपीटल रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार याठिकाणी बेकायदेशीरपणे ऑर्केस्ट्रा व डान्सबार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी रविवारी पहाटे दीडच्या सुमारास हगलूर येथील एम. ए. कॅपीटल रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी याठिकाणी काही महिला अंगावर तोकडे कपडे घालून बिभित्स हावभाव व अंगविक्षेप करून डी. जे. म्युझिकच्या तालावर नृत्य करीत असून त्यांच्यावर समोर ग्राहक म्हणून काही लोक बसलेले दिसून आले. यावेळी पोलिसांनी बारच्या मालकाकडे व मॅनेजरकडे ऑर्केस्ट्रा बार परवानाबाबत चौकशी केली असता तो परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणाहून बार मालकासह मॅनेजर, तेथील कामगार, ग्राहक व 6 महिलांना ताब्यात घेऊन बारमधील साऊंड सिस्टिम, कुलर, लॅपटॉप, लाईट सिस्टिम, मद्याचा साठा, 15 दुचाकी असा 14 लाख 46 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात आणला व गुन्हा दाखल केला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव, पोलिस अंमलदार संदीप काशिद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, समीर शेख, प्रमोद माने, हवेल जाधव, शिवाजी मोरे, महिला पोलिस कर्मचारी अनिसा पटेल, सुनंदा झळके यांनी केली.

Back to top button