सोलापूर : प्रारूप मतदार याद्यांबाबत तब्बल 495 हरकती | पुढारी

सोलापूर : प्रारूप मतदार याद्यांबाबत तब्बल 495 हरकती

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत एकूण 495 हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकतींचे प्रमाण मोठे असल्याने प्रशासनाकडून चुकीचे काम झाल्याचे निदर्शनास आले.

मनपाच्या निवडणूक शाखेने 23 जून रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी केली होती. नवीन रचनेनुसार शहरात एकूण 38 प्रभाग आहे. यातील बहुतांश प्रभागांमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचे हरकतींवरुन स्पष्ट झाले आहे. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसर्‍याच प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तसेच दुसर्‍या प्रभागातील नावे आपल्या प्रभागात आल्याने मतदारांसह निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची भंबेरी उडाली आहे.

23 जूनपासूनच हरकत घेण्यास सुरुवात झाली होती. हरकतींसाठी 1 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पण हरकतींचे प्रमाण वाढतच चालल्याने हरकतींंना 3 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 3 जुलैअखेर एकूण 495 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान, हरकती प्राप्त होताच लगेचच त्यावर सर्व्हे करण्याचे काम मनपा निवडणूक शाखेकडून सुरू झाले आहे. याकामी त्यांना माजी नगरसेवक, राजकीय कार्यकर्त्यांची मदत होत आहे. हरकतींची दखल घेऊन मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

अंतिम मतदार यादी 9 जुलैला

Back to top button