सोलापूर : नुपूर शर्मा, नवीन जिंदलच्या अटकेसाठी एमआयएमचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | पुढारी

सोलापूर : नुपूर शर्मा, नवीन जिंदलच्या अटकेसाठी एमआयएमचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. भाजपच्या या दोन्ही नेत्यांच्या अटकेसाठी सोलापुरातील एमआयएम पक्षाच्यावतीने शुक्रवारी (दि.१०) अडीच वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी फारूख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

यावेळी एमआयएमच्यावतीने भाजपच्या या दोन्ही नेत्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा. अशी मागणी करत, जिल्हाधिकार्‍यांना याचे निवेदन देण्यात आले. भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच मुस्लिम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. या विरोधात सरकारने ठोस पाऊले उचलावीत अन्यथा येणार्‍या काळात मुस्लिम समाज भाजपला धडा शिवल्याशिवाय राहणार नाही.

एमआयएम हा पक्ष सर्वधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही धर्मावर टीका करत नाही. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाने हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर, येणार्‍या काळात आम्ही त्यांना धडा शिकवू असेही फारूख शाब्दी म्हणाले. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात एमआयएम पक्षाचे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button