बार्शीतील कार चोरटा जेरबंद, माढा येथे पाेलिसांची कारवाई   | पुढारी

बार्शीतील कार चोरटा जेरबंद, माढा येथे पाेलिसांची कारवाई  

माढा; पुढारी वृत्तसेवा: बार्शीतील कार चोरुन पलायन करत असताना माढा पोलिसांनी नाकाबंदी करत संशयित आरोपीसह गाडी ताब्यात घेतली. ही घटना माढा शहरातआज (दि. १५) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. बार्शीतील कार चाेरीप्रकरणी अमजद अन्वर शेख ( वय-३२ वर्ष, रा.बाशींगे प्लॉट, बार्शी) असे ताब्‍यात घेतलेल्‍या संशयित आराेपीचे नाव आहे.

माढा पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, ब्रिझा कार ( MH-13-CS 4141) बार्शी शहरातून चोरीस गेली आहे.

कार माढ्याच्या दिशेने येणार असल्‍याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तत्काळ माढा शहरातील कुर्डूवाडी बायपास चौक व छ.शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी केली.

साडेबारा वाजण्‍याच्‍या सुमारास कुर्डूवाडी बायपास चौक माढा येथे पोहेकॉ शिंदे, सपोफौ खंडागळे व त्‍यांचे सहकारी वाहन तपासणी करत असताना चोरीस गेलेली कार आढळली.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता  अमजद अन्वर शेख याने कार भवानी पेठ बार्शी येथुन चोरल्याची कबुली दिली.

कार चोरीला गेल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची खात्री करत अमजद शेख याला माढा पोलिसांनी बार्शी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोसई घोंगडे, सपोफौ खंडागळे, पोहेकॉ शिंदे, पोना देशमुख, पोना शिंदे यांनी केली.

हेही वाचलं का ? 

Back to top button