‘पंढरीच्या आषाढी वारीसाठी स्पेशल गाड्या सोडणार’ | पुढारी

‘पंढरीच्या आषाढी वारीसाठी स्पेशल गाड्या सोडणार’

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पंढरपुरात होणार्‍या आगामी आषाढी वारीसाठी सोलापूर रेल्वे विभागाकडून लवकरच स्पेशल गाड्या सोडणात येणार आहेत. याचा प्रस्ताव लवकरच येईल, अशी माहिती सोलापूर रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी परराज्यांसह महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सेवेसाठी रेल्वेच्या सोलापूर विभागातून स्पेशल गाड्यांची सोय लवकरच करण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तसा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयातून येईल.

कोरोनाच्या दोन वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे वारीसाठी रेल्वेच्या स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या होत्या, तशाच स्पेशल गाड्या दौंड, पुणे, लातूर, नांदेड, भुसावळ, नागपूर, अशा विविध ठिकाणांहून सोडण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध भागांतून पंढरीकडे येणार्‍या भाविकासंठी आम्ही त्यांच्या सोयीसाठी लवकरच या स्पेशल गाड्यांची घोषणा करणार आहोत, असे हिरडे यांनी सांगितले.

Back to top button