पंढरपूर : वृक्ष लागवड फसवणूकप्रकरणी अधिकारी निलंबित : पालकमंत्री | पुढारी

पंढरपूर : वृक्ष लागवड फसवणूकप्रकरणी अधिकारी निलंबित : पालकमंत्री

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे वृक्ष लागवड योजनेच्या नावाखाली राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अधिकार्‍याला निलंबित केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली होती.

राज्यमंत्री भरणे म्हणाले की, राज्यभरातील 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. लवकरच अहवाल सादर करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. 33 कोटी वृक्ष लागवडीप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
यासंदर्भात सदस्य किशोर दराडे, मनिषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मधील वृक्षलागवड योजनेबाबत अफरातफर झाल्यामुळे संबंधित वनक्षेत्रपाल अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

 

Back to top button