सोलापुरात बंद घर फोडून 18 लाख रुपयांची चोरी | पुढारी

सोलापुरात बंद घर फोडून 18 लाख रुपयांची चोरी

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  अक्कलकोट रस्त्यावरील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व 12 लाख 50 हजारांची रोकड असा 18 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सुनील सत्यनारायण कोंडा (वय 52, रा. विश्वकर्मा रेसिडेन्सी, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

गेल्या शनिवारी (दि. 19) कोंडा हे कुटुंबीयांसह घर बंद करून परगावी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून 2 लाख 20 हजारांचा सोन्याचा शकुंतला हार व 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असे 11 तोळे सोने, 1 लाख 80 हजारांचे सोन्याचे गंठण, 1 लाख 40 हजारांच्या 7 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 10 हजारांचे कानातील सोन्याचे झुमके, 10 हजारांची सोन्याची चेन, 10 हजारांचे सोन्याचे गंठण, 30 हजारांचा सोन्याचा लक्ष्मीदेवीचा बिल्ला व 12 लाख 50 हजारांची रोकड असा 18 लाख 70 हजारांचा ऐवज लांबविला.

या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असे 11 तोळे सोने, 1 लाख 80 हजारांचे सोन्याचे गंठण, 1 लाख 40 हजारांच्या 7 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 10 हजारांचे कानातील सोन्याचे झुमके, 10 हजारांची सोन्याची चेन, 10 हजारांचे सोन्याचे गंठण, 30 हजारांचा सोन्याचा लक्ष्मीदेवीचा बिल्ला व 12 लाख 50 हजारांची रोकड असा 18 लाख 70 हजारांचा ऐवज लांबविला.
या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Back to top button