सोलापूर विद्यापीठात भूकंप पूर्वसूचना यंत्रणेची उभारणी | पुढारी

सोलापूर विद्यापीठात भूकंप पूर्वसूचना यंत्रणेची उभारणी

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  भूकंपामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. अशा धोक्याची पूर्वसूचना मिळाली तर त्यातून सावरण्याबरोबरच नुकसान टाळता येते. आता हे शक्य होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भूकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी ‘रेडॉन जिओ स्टेशन’ ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे आता सोलापूरपासून सुमारे साडेचारशे ते पाचशे किलोमीटर परिसरात भूकंपासंदर्भात किमान 15 दिवस अगोदर पूर्वसूचना मिळणार आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते यंत्रणेचेे लोकार्पण झाले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, विद्यापीठातील भूगर्भ विषयाचे प्रा. डॉ. धवल कुलकर्णी, डॉ अंजना लावंड, डॉ. माया पाटील, प्रा. योगेश दुरुगवार, डॉ. विनायक धुळप, डॉ. एस. पी. बावीस्कर आदी उपस्थित होते.

1993 ला झालेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपातील जिवीत आणि वित्त हानीच्या आठवणींनी आजही अंगावर शहारे आणतात.
तज्ज्ञांच्या मते तापमानातील बदल आणि भूगर्भातील तापमानात वाढ यामुळे भूकंप होतात. जगभरात मोठ्या अनेकवेळा झालेल्या भूकंपांमुळे मोठी गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली आहेत. हा धोका टाळण्यासाठी यावर वर्षानुवर्षे संशोधन सुरू आहे. त्यामध्ये थोड्या फार प्रमाणात यश येऊ लागले आहे. होळकर विद्यापीठात बसविलेले ही यंत्रणा यावरच मुख्य काम करणार आहे.

याबाबत प्रा. डॉ. धवल कुलकर्णी म्हणाले, भूकंपाची पूर्वसूचना देणार्‍या अशाच पद्धतीच्या यंत्रणेचा आविष्कार सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात करण्यात आला आहे. सोलापूर विद्यापीठ आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. त्यामध्ये तीन फूट जमिनीखाली हे उपकरण बसविले आहे. ते स्वतः भाभा अणुसंशोधन केंद्राने बनवले असून सौर ऊर्जेवर ही यंत्रणा चालते.

ते म्हणाले, रेडॉन गॅस हा रेडिओ अ‍ॅक्टिव्ह सामग्रीचा उपपदार्थ आहे. भूकंपाच्या हालचाली जमिनीमध्ये सुरू झाल्यानंतर हे उपकरण रेडॉनचे उत्सर्जन मोजते. अशाप्रकारची भूकंपपूर्व क्रिया होण्यापूर्वी पाण्याच्या झर्‍यामध्ये रेडॉनचे प्रमाण वाढल्याचे आधीच आढळून आले आहे. हे उपकरण रेडॉन शोधून काढून लगेच पुढे सिग्नल पाठविते. त्यामुळे भूकंप होण्यापूर्वी जमिनीत हालचाली सुरू झालेल्या असतात. त्या संदर्भाची माहिती या यंत्रणेकडून प्राप्त होते. त्यामुळे भूकंपापूर्वीच सुरक्षा आणि मालमत्तेच्या बचावासाठी सतर्कता बाळगण्यात सर्वांना मदत मिळते.

याबाबत डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठात बसवण्यात आलेल्या या रेडॉन जिओ स्टेशनमुळे विद्यार्थी व अभ्यासकांना संशोधन करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा विद्यार्थी व अभ्यासकांनी घेतला पाहिजे. तसेच, या उपक्रमामुळे भुकंपासंदर्भात पूर्वसूचना मिळून सतर्क राहण्यास मदत मिळणार आहे.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते यंत्रणेचेे लोकार्पण झाले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, विद्यापीठातील भूगर्भ विषयाचे प्रा. डॉ. धवल कुलकर्णी, डॉ अंजना लावंड, डॉ. माया पाटील, प्रा. योगेश दुरुगवार, डॉ. विनायक धुळप, डॉ. एस. पी. बावीस्कर आदी उपस्थित होते.

1993 ला झालेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपातील जिवीत आणि वित्त हानीच्या आठवणींनी आजही अंगावर शहारे आणतात. तज्ज्ञांच्या मते तापमानातील बदल आणि भूगर्भातील तापमानात वाढ यामुळे भूकंप होतात. जगभरात मोठ्या अनेकवेळा झालेल्या भूकंपांमुळे मोठी गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली आहेत. हा धोका टाळण्यासाठी यावर वर्षानुवर्षे संशोधन सुरू आहे. त्यामध्ये थोड्या फार प्रमाणात यश येऊ लागले आहे. होळकर विद्यापीठात बसविलेले ही यंत्रणा यावरच मुख्य काम करणार आहे. याबाबत प्रा. डॉ. धवल कुलकर्णी म्हणाले, भूकंपाची पूर्वसूचना देणार्‍या अशाच पद्धतीच्या यंत्रणेचा आविष्कार सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात करण्यात आला आहे.

सोलापूर विद्यापीठ आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. त्यामध्ये तीन फूट जमिनीखाली हे उपकरण बसविले आहे. ते स्वतः भाभा अणुसंशोधन केंद्राने बनवले असून सौर ऊर्जेवर ही यंत्रणा चालते. ते म्हणाले, रेडॉन गॅस हा रेडिओ अ‍ॅक्टिव्ह सामग्रीचा उपपदार्थ आहे. भूकंपाच्या हालचाली जमिनीमध्ये सुरू झाल्यानंतर हे उपकरण रेडॉनचे उत्सर्जन मोजते. अशाप्रकारची भूकंपपूर्व क्रिया होण्यापूर्वी पाण्याच्या झर्‍यामध्ये रेडॉनचे प्रमाण वाढल्याचे आधीच आढळून आले आहे. हे उपकरण रेडॉन शोधून काढून लगेच पुढे सिग्नल पाठविते. त्यामुळे भूकंप होण्यापूर्वी जमिनीत हालचाली सुरू झालेल्या असतात. त्या संदर्भाची माहिती या यंत्रणेकडून प्राप्त होते. त्यामुळे भूकंपापूर्वीच सुरक्षा आणि मालमत्तेच्या बचावासाठी सतर्कता बाळगण्यात सर्वांना मदत मिळते.याबाबत डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठात बसवण्यात आलेल्या या रेडॉन जिओ स्टेशनमुळे विद्यार्थी व अभ्यासकांना संशोधन करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा विद्यार्थी व अभ्यासकांनी घेतला पाहिजे. तसेच, या उपक्रमामुळे भुकंपासंदर्भात पूर्वसूचना मिळून सतर्क राहण्यास मदत मिळणार आहे.

संशोधनाला वाव मिळणार : डॉ. फडणवीस

विद्यापीठात बसविण्यात आलेल्या रेडॉन जिओ स्टेशनमुळे विद्यार्थी व अभ्यासकांना संशोधन करण्याची चांगली संधी मिळणार आहे. येथील विद्यार्थी अभ्यासकांना त्याचा फायदा होणार आहे. भूकंपासंदर्भात पूर्वसूचना देणार्‍या या यंत्रणेमुळे 500 कि.मी. अंतरातील अनेक जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.

Back to top button