सोलापूर : वायर तोडल्याच्या कारणावरून खुनी हल्ला; चौघांवर गुन्हा | पुढारी

सोलापूर : वायर तोडल्याच्या कारणावरून खुनी हल्ला; चौघांवर गुन्हा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  वायर तोडलेली का सांगितली, म्हणून सत्तरने मारहाण करून खुनी हल्ला करणार्‍या चौघांवर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विष्णू भगवान जाधव (वय 45, रा. जित्ती, ता. मंगळवेढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पंकज भगवान जाधव, राहुल कृष्णा जाधव, सचिन कृष्णा जाधव आणि लक्ष्मी कृष्णा जाधव (सर्व रा. जित्ती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मार्च रोजी रात्री विष्णू जाधव, पत्नी अर्चना व मुलगा सूरज हे विहिरीमधील पाणी काढण्यासाठी मोटार जोडत होते. विष्णूचा भाऊ पंकजने विहिरीतील मोटार व पाण्याच्या वादातून मोटार पेटीच्या वायर तोडल्या होत्या. त्यावेळी पत्नी अर्चना हिने विष्णूला हाक मारून पंकजने वायरी तोडल्याचे सांगितले. त्यावेळी तिघेही घरी परत जात असताना लालू मुलाणी यांच्या शेतात पंकज, राहुल, सचिन, लक्ष्मी हे सर्वजण आले. वादावादी करत पंकजने अर्चनाच्या डोक्यात सत्तूर मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला, तर इतरांनी दगड फेकून मारून जखमी केले.

Back to top button