सोलापूर : खुनासह दरोड्यातील सहाजणांना अटक, दोन फरार | पुढारी

सोलापूर : खुनासह दरोड्यातील सहाजणांना अटक, दोन फरार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात पडलेला दरोडा आणि त्यातील मारहाणीत झालेला वृद्धाच्या खुनाचा तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत लावला. या गुन्ह्यातील सहा आंतरराज्य गुन्हेगारांना अटक केली. अन्य दोघे फरार आहेत. अटक करण्यात आलेले गुन्हेगार हे ऊसतोड मजूर असून, त्यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

वैभव ऊर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. अहमदनगर), संतोष झोडगे (रा. डोकेवाडी,, ता. भूम, जि. उस्मानाबाद),
अजय देवगण उर्फ देवगण सपा शिंदे (रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. तर अक्षय काळे (रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) आणि अनुज उर्फ भैय्या नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) हे दोघे फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

सोलापुरातून अजय देवगणला अटक ?

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्ह्ेगारांमधील एकाचे टोपण नाव अजय देवगण आहे. मात्र, अटक करण्यात आलेला देवगण हा अभिनेता नसून ऊसतोड कामगार कम दरोडेखोर आहे. हे अजय देवगण नाव मात्र तपास पथकातील कर्मचार्‍यांमध्ये विनोदाचा विषय ठरले.

Back to top button