सोलापूर : मुलींनी चिमण्यांसाठी बनविली दोन हजार घरटी | पुढारी

सोलापूर : मुलींनी चिमण्यांसाठी बनविली दोन हजार घरटी

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : जागतिक चिमणी दिनानिमित्त पोलिस आयुक्तालय, एनसीसीएस आणि भू.म. पुल्ली कन्या प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने चिमण्यांसाठी दोन हजार घरटी तयार करण्यात आली.

शहरातील चिमण्यांची संख्या रोडावली आहे. यामुळे जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधत आपल्या घराभोवती चिमणी परत येण्यासाठी त्यांची घरटी बनविण्याची कार्यशाळा पोलिस आयुक्तालय, एनसीसीएस आणि भू.म. पुल्ली कन्या प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्त हरिष बैजल यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थिनींनी दोन हजार घरटी तयार केली. त्यांची ‘चिमणी वाचवा’ अक्षरात मांडणी केली. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, ‘आपल्या घरचा एक कोपरा चिऊताईसाठी’, ‘चारा पाणी ठेऊन जिव्हाळा दाखवू’ यासारखे संदेश असलेले फलक मान्यवरांच्या हस्ते फुग्यांसाह आकाशात सोडण्यात आले.

चिमण्या दयाळू आहेत. तसेच निसर्गातील गुरू आहेत. त्यांच्याकडून माणसाने खूप गोष्टी घेतल्या आहेत. मात्र, तो आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ते रोखण्यासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. मानवाने गेल्या चिमण्या कुणीकडे, असे टाहो फोडत बसण्यापेक्षा या चिमण्यांनो परत फिरारे म्हणून आरोळी मारायची वेळ आली आहे.
– डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक 

Back to top button