सोलापूर : सांगोला तालुक्यातील ६० टक्के डाळिंब बागा काढल्या | पुढारी

सोलापूर : सांगोला तालुक्यातील ६० टक्के डाळिंब बागा काढल्या

सोलापूर / महूद : दीपक धोकटे : सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी 19 हजार हेक्टरपैकी 60 टक्क्यांहून अधिक बागा काढल्या आहेत. आणखी 20 टक्के बागा काढण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘डाळिंबाची पंढरी’ ही सांगोला तालुक्याची ओळख पुसण्याच्या उंबरठ्यावर आहे.

पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या बागा शेतकर्‍यांनी तोडण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी 20 मे ते डिसेंबरपर्यंत सतत कोसळणारा पाऊस आणि रोगराईचे अतिक्रमण या कारणांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. एखतपूरचे सुनील अवताडे आणि शहाजी इंगोले यांनी काळजावर दगड ठेऊन डाळिंबाची बाग काढून टाकण्यास सुरुवात केली. या दोघांनाही तीन वर्षांपासून डाळिंबापासून नुकसान होत आहे. कीटकनाशक आणि बुरशीनाशकामुळे रोग आटोक्यात येत नाही म्हणून बाग काढण्याचा निर्णय घेतल्याचे दोघांनी सांगितले. डाळिंबाच्या बागेच्या जागेवर शेतकरी पेरू, आंबा, सीताफळ, केळी लागवड करू लागले आहेत. मे महिन्यात पावसाच्या हजेरीला गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली. पहिल्या वर्षी त्याचे विशेष विपरित परिणाम जाणवले नाहीत. मात्र गेल्यावर्षीच्या पावसाने बागा उजाड झाल्या.

सांगोला तालुक्यात 1982 पासून डाळिंब लागवडीची चळवळ उभी राहिली. 2000 पासून डाळिंबाच्या लागवडीने व्यापक रुप धारण केले. बागेतून चार पैसे मिळत असताना डाळिंबाच्या पोषणासाठी असलेली जमीन आणि हवामान हे कारण त्यामागे राहिले. आता डाळिंबाची बाग लागवड करण्यापासून दोन वर्षांनी उत्पादन घेण्यास सुरुवात करेपर्यंत हेक्टरी सात लाखांचा खर्च करावा लागत आहे. मात्र ही बाब शेतकर्‍यांच्या आटोक्यात राहिलेली नाही म्हणूनच पुन्हा एकदा डाळिंबाच्या बागा उभ्या राहण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे, असे डाळिंब उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी म्हटले आहे.

रोग आटोक्यात येत नाही म्हणून बाग काढण्याचा निर्णय घेतल्याचे दोघांनी सांगितले. डाळिंबाच्या बागेच्या जागेवर शेतकरी पेरू, आंबा, सीताफळ, केळी लागवड करू लागले आहेत. मे महिन्यात पावसाच्या हजेरीला गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली. पहिल्या वर्षी त्याचे विशेष विपरित परिणाम जाणवले नाहीत. मात्र गेल्यावर्षीच्या पावसाने बागा उजाड झाल्या. सांगोला तालुक्यात 1982 पासून डाळिंब लागवडीची चळवळ उभी राहिली.

2000 पासून डाळिंबाच्या लागवडीने व्यापक रुप धारण केले. बागेतून चार पैसे मिळत असताना डाळिंबाच्या पोषणासाठी असलेली जमीन आणि हवामान हे कारण त्यामागे राहिले. आता डाळिंबाची बाग लागवड करण्यापासून दोन वर्षांनी उत्पादन घेण्यास सुरुवात करेपर्यंत हेक्टरी सात लाखांचा खर्च करावा लागत आहे. मात्र ही बाब शेतकर्‍यांच्या आटोक्यात राहिलेली नाही म्हणूनच पुन्हा एकदा डाळिंबाच्या बागा उभ्या राहण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे, असे डाळिंब उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी म्हटले आहे.

Back to top button