सोलापूर : शेटफळजवळ मालट्रक पलटी; एक ठार | पुढारी

सोलापूर : शेटफळजवळ मालट्रक पलटी; एक ठार

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा पंढरपूर-शेटफळ रोडवर शेटफळ जवळ वाघगज वस्ती दरम्यान मालट्रक पलटी झाला. या अपघातात एकाचा मृत्‍यू झाला. हा अपघात आज (रविवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून ऊस तोडणी मजूर, प्रापंचिक साहित्य, म्हैस हे सर्व गावाकडे बीड जिल्ह्यात घेवून निघाले होते. माल वाहतूक ट्रक (क्रमांक एम एच ०९ एफ एल३८५२) मध्ये पाठीमागे मालासोबत ते बसले होते.
कोल्हापूरहून पंढरपूर मार्गे शेटफळ जवळ आल्यानंतर ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटला. मालट्रक रस्‍त्‍याच्या बाजूस जाणून पलटी झाला. यात लक्ष्मण मानीकराव बाहीरवाल (वय ५० रा. भाळवणी ता. जि. बिड) याच्या डोक्यास मार लागून ते जखमी झाले.

हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमास घडला. जखमीस मोडनिंब येथे सरकारी दवाखण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वी त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत वाहन चालक सुभाष शिवाजी गुजर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

Back to top button