सोलापूर : कारच्या धडकेत काळविटाचा मृत्यू | पुढारी

सोलापूर : कारच्या धडकेत काळविटाचा मृत्यू

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : भरधाव जाणार्‍या कारच्या धडकेने महामार्गावर आलेल्या काळविटाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील शिंगोलीजवळील शहा पेट्रोल पंपाजवळ घडली. अपघातात मयत काळविटावर वन विभागाने तातडीने अंत्यसंस्कार केले. परंतु, ज्या कारच्या धडकेने काळवीट मयत झाले त्या चालकावर मात्र कसलीही कारवाई करण्यात आली नाही.

सोलापूर-मंगळवेढा मार्गावर कामती, कुरुल या परिसरात वन विभागाच्या जमिनी  आहेत. तेथे काळविटासह अन्य प्राण्यांचा वावर आहे. तो त्यांच्यासाठी आदिवास जाहीर आहे. परंतु सोलापूर-मंगळवेढा महामार्ग झाल्याने या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. परिणामी काहीवेळेला वन्य प्राणी रस्त्यावर येऊन अपघाताचे प्रसंग होतात. आजही त्याचप्रकारे अपघातात काळविटाचा मृत्यूू झाला.

सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील शिंगोली गावाजवळील शहा पेट्रोल पंपाजवळ सोलापूरच्या दिशेने भरधाव येणार्‍या मोटारीने (क्र. एमएच 45 एन 5230) चारचाकी काळविटाला जोराची धडक दिली. त्यात ते काळविट रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडले. त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

अपघातानंतर याठिकाणी जमलेल्या नागरीकांनी याबाबत कामती पोलिस ठाण्याला कळविले. त्यावेळी पोलिस हवालदार एस. जे. माने यांनी घटनास्थळी येऊन वनविभागाचे वनरक्षक थोरात, वनसेवक लालू पवार, संभाजी आवताडे यांना बोलावून त्यांच्या ताब्यात मयत

काळवीटचा मृतदेह दिला.
वनविभागाचे कर्मचार्‍यांनी याचा तात्काळ पंचनामा करून काही वेळामध्येच मयत काळवीटवर अंत्यसंस्कार केले. परंतु, ज्या कारच्या धडकेने हे काळावीट मयत झाले, त्या कारचालकावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेले नाही.

Back to top button