Solapur Accident : पिकअप जीप, दुचाकी धडकेत दोन ठार | पुढारी

Solapur Accident : पिकअप जीप, दुचाकी धडकेत दोन ठार

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : पुणे – सोलापूर महामार्गावर उजनी पाटीजवळ विरुद्ध दिशेन पिकअप जीप व दुचाकी यांच्यात सामोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू (Solapur Accident) झाला. यात एक जण धडक लागून तर दुसरा पिकअप पलटी झाल्याने पिकअप खाली दबून ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ६.०० वा. सुमारास घडला.

अनिल सुशील देवकर (वय-२० वर्षे) रा.कंदर ता.करमाळा जि.सोलापूर व अब्दुल मफु शेख (वय-३०) रा.हल्ली आढेगाव ता.माढा (मूळ गाव-पाचूटोला, ता.मापिक चेक,जि.मालदा (प.बंगाल) अशी मयताची नावे आहेत. (Solapur Accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायं. ६.०० वा.सुमारास अनिल सुशील देवकर हा इंदापूर येथून टेंभुर्णीकडे मोटार – सायकलवरून (क्र-एमएच-१२-डीए-९५६३) येत होता. तर पिकअप टेम्पो हा उजनी येथून केळी भरून आला होता. उजनी पाटी जवळ महामार्गावरून समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअप टेम्पोने (क्र-एम.एच-४५-एएफ-४७२६) देवकर याच्या मोटर सायकलला समोरून जोरदार धडक(Solapur Accident) दिली. या धडकेत डोक्यास मार लागल्याने अनिल देवकर याचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात होताच केळी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. टेम्पोत बसलेला अब्दुल शेख हा मजूर टेम्पोच्या खाली पडल्याने त्याचा दबून मत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, धडक होताच पिकअप टेम्पो रस्ता दुभाजकाच्या बाजूला जाऊन पलटी झाली.

या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

 

Back to top button