सोलापूर : माळशिरस नगर पंचायतीवर भाजपचे स्पष्ट बहुमत | पुढारी

सोलापूर : माळशिरस नगर पंचायतीवर भाजपचे स्पष्ट बहुमत

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : नगर पंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निविवाद स्पष्ट बहुमत मिळविले आहे. माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी अर्चना देशमुख व माजी नगरसेवक शोभा धाईंजे व त्याचे पती आबा धाईंजे हे भाजपकडून निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या असून महाराष्ट्र विकास आघाडीला दोन तर अपक्ष तीन उमेदवार निवडून आले आहेत. नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून महाराष्ट्र विकास आघाडीने प्रथमच नगरपंचायत प्रवेश केला आहे.

माळशिरस नगर पंचायत निकाल विजयी उमेदवार …. प्रभाग १ – कैलास वामन ( म.वि.आ ) प्रभाग २- ताई वावरे ( अपक्ष ) बिनविरोध प्रभाग ३ -पुनम वळकुंदे ( अपक्ष )प्रभाग ४- विजय देशमुख ( भाजप ) प्रभाग ५ -शोभा धाईजे ( भाजप ) प्रभाग ६ – आबा धाईंजे ( भाजप ) प्रभाग ७- आप्पासाहेब देशमुख ( भाजप ) प्रभाग ८ – कोमल जानकर ( भाजप ) प्रभाग ९ -राणी शिंदे ( भाजप ) प्रभाग १०- अर्चना देशमुख ( भाजपा ) प्रभाग ११ रेष्मा टेळे ( म.वि.आ ) प्रभाग १२-प्राजक्ता ओवाळ ( भाजप ) प्रभाग १३ -शिवाजी देशमुख ( राष्ट्रवादी )प्रभाग १४- मंगल गेजगे ( अपक्ष ) प्रभाग १५- मंगल केमकर ( भाजप ) प्रभाग १६ पुष्पावती कोळेकर ( भाजप ) प्रभाग १७ रघुनाथ चव्हाण ( राष्ट्रवादी ) अशा एकूण भाजप – १० राष्ट्रवादी – २ मा वि आ. २, अपक्ष – ३ असा निकाल हाती आला.

Back to top button