पंढरपूर : पालखी समवेत 30 मानकऱ्यांना पायी जाण्याची प्रशासनाने दिली परवानगी | पुढारी

पंढरपूर : पालखी समवेत 30 मानकऱ्यांना पायी जाण्याची प्रशासनाने दिली परवानगी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पालखी समवेत 30 मानकऱ्यांना पायी जाण्याची अखेर प्रशासनाने परवानगी दिली.

पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी वाखरी येथे आलेल्या 10 मानाच्या पालखीच्या वारकऱ्यांनी अचानक शासनाने ठरवून दिलेल्या भाविकांसह पुढे जाण्यास नकार दिला आणि 40 वारकऱ्यांना जाण्याची परवानगी देण्याचा आग्रह धरला होता.

अधिक वाचा :

वारकऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेपुढे अखेर प्रशासनाने नमते घेत 30 वारकऱ्यांना पालखी सोबत पंढरपूरमध्ये चालत जाण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे सर्व आता पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत.

पंढरपूर

पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून एस टी बसने आलेल्या वारकऱ्यांनी वाखरी येथे आल्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेत, पायी चालत सर्व 40 वारकऱ्यांसह पंढरीत जाऊ अन्यथा इथेच थांबू अशी भूमिका घेतली.

 

 

अधिक वाचा :

त्यामुळे प्रशासन हवालदिल झाले होते. यापूर्वी शासनाने वाखरी ते विसावा इथपर्यंत प्रत्येक पालखी सोबत 40 वारकरी आणि विसावा येथून पंढरपूर पर्यंत प्रत्येक पालखी सोबत 2 वारकऱ्यांना जाण्यास परवानगी दिली होती.

मात्र वारकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारून जाऊ तर सर्व 40 वारकऱ्यांना जाऊ द्या नाही तर नाही अशी भूमिका जाहीर केली.

धिक वाचा :

त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र वारकरी ठाम होते. शेवटी वाखरी ते इसबावी विसावा मंदिर एस टी बसमधून आणि तिथून पंढरपूर पर्यंत 30 वारकरी प्रत्येक पालखी सोबत पायी जाण्याचा तोडगा प्रशासनाने मान्य केला आणि पालख्या पुढे मार्गस्थ झाल्या.

अखेर वारकऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेपुढे अखेर प्रशासनाने नमते घेत 30 वारकऱ्यांना पालखी सोबत पंढरपूरमध्ये चालत जाण्यास परवानगी दिली आहे

हे देखिल वाचा :

हे देखिल पहा : 

 

 

Back to top button