सोलापूर : उसाच्या ट्रॅक्टरची धडक लागून तरुण ठार - पुढारी

सोलापूर : उसाच्या ट्रॅक्टरची धडक लागून तरुण ठार

सोलापूर : बुधवार पेठ परिसरात पायी रस्ता ओलांडताना उसाच्या ट्रॅक्टरची धडक लागून ट्रॅक्टरच्या खाली आल्याने त्यात गंभीर जखमी झालेला तरुण ठार झाला.

विजय रामचंद्र साबळे (वय २८, रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ) असे मयत तरुणाचे नाव असून अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकी येथे झाली आहे. सदर ट्रॅक्टर चालकास फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

साखर कारखाने सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक ट्रॅक्टर मधून होते. ट्रॅक्टरचा आवाज मोठा असल्याने चालकाला काहीही समजत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक निष्पाप लहान मुलांचा बळी सुद्धा गेला आहे.

Back to top button