सातारा : कास पठारावर भरली पर्यटकांची जत्रा

वाहतुकीची वारंवार कोंडी; 10 हजारांवर निसर्गप्रेमींची गर्दी
Kas Plateau festival
Published on
Updated on

बामणोली : जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेले कास पठार विकेंडमुळे रविवारी पर्यटकांनीही फुलून गेले. विविध रंगी फुलांचा अनोखा नजारा डोळ्यात साठवत पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. कधी ऊन तर कधी पावसाची भुरभुर अशा आल्हादायी वातावरणात शनिवार व रविवारी देेशभरातील सुमारे दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे सातारा-कास मार्गावरील वाहतूक कोलमडून पडली. वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

Kas Plateau festival
सातारा : वहागाव येथील बेपत्ता मुलीचा सात तासात शोध

कास पठारावर शनिवार व रविवारमुळे गेले दोन दिवस पर्यटकांची तोबा गर्दी झाली. हजारो पर्यटकांनी रविवारी एकच गर्दी केली होती. त्यामुळे घाटाई मार्गावरील वाहनतळासह कास तलावाकडील पार्किंग हाऊसफुल्ल होऊन वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण झाली होती. अनेक पर्यटकांनी वाहने मुख्य रस्त्यावर पार्क करून पठारावर जाणे पसंत केल्याने घाटाई फाटा व पठार परिसरात दुपारच्या सत्रात वाहतूक कोंडी झाली होती.काही वेळ पारंबे फाटा व घाटाई रोडवर वाहतूक कोलमडली. कास, बामणोलीकडे जाणार्‍या वाहतुकीला कोंडीचा फटका बसला. मात्र, दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले. एकाच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने नियोजनकर्त्यांची दमछाक होताना दिसत आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा ऊन- पावसाचा खेळ सुरू केल्याने फुलांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. टोपली, कारवीच्या जांभळ्या रंगांच्या फुलांचे गालिचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत असल्याने ते पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. त्यासोबत गुलाबी तेरडा, पांढरा धनगर फेटा, चवर, पिवळी सोनकी, आभाळी, नाभाळी, सीतेची आसवे, टुथब्रश आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांचाही चांगला बहर सुरू झाला आहे.

Kas Plateau festival
सातारा : ‘कास’ खुलले; पठार बहरू लागले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news