

कराड : वाघेरी येथील युवकाचे लग्न ठऱले असताना मुलीच्या भावकीतील एकाने संबंधित युवकास मित्रांच्या मदतीने मारहाण केली. त्यामध्ये संबंधित युवक गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचास सुरु आहेत. पंकज पोपट कदम (वय 22, रा वाघेरी) असे संबंधित युवकाचे नाव असुन त्याने दिलेल्या तक्रारीवरुन विवेक सुहास सत्रे, कैलास विजय माळी (रा. वाघेरी), पारस पिसाळ, अथर्व पिसाळ ( रा. करवडी, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी : पंकत कदम हा ओगलेवाडी येथील खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचे त्याच्याच गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्या दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचा विवाह ठरवला होता. तो 16 नोव्हेंबरला होणार होता. पंकज कामावरुन घरी जात असताना मुलीच्या भावकीतील विवेक सुभाष सत्रे, कैलास विजय माळी, पारस पिसाळ व अथर्व पिसाळ यांनी त्याची गाडी ओगलेवाडी येथील रेल्वे फाटकच्या अलीकडे अडवली. त्यावेली अथर्व पिसाळ याने तुझा काय विषय हाय असे म्हणुन त्याच्या कानाखाली मारली. त्यानंतर पारस पिसाळ याने तु काय बोलत आहेस असे म्हणु लागल्याने पंकजने त्याचा मोबाईल काढुन भावाला बोलवितो असे सांगितल्यावर विवेक सत्रे याने त्याचा मोबाईल काढुन घेतला.
त्यानंतर पारस पिसाळ याने माझे मानेला धरुन पंकजा खाली वाकविले तेवढ्यात विवेक सत्रे याने त्याचे पाठीमागुन कोयता काढुन त्याने त्या कोयत्याने पंकजच्या डोक्यात पाठीमागील बाजुस, उजव्या कानावर, उजव्या गालावर, उजव्या खांद्यावर, बोटॉवर व डावे हाताचे मनगटावर व बोटांवर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. त्याचवेळी कैलास माळी याने लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यानंतर पंकज जीव वाचविण्यासाठी पळु लागल्यावर त्याचा संबंधितांनी पाठलाग केला. त्यावेळी पंकज झुडपात लपुन बसला. काही वेळाने संशयीत निघुन गेल्याने तो रिक्षातुन उपजिल्हा रुग्णालयात आला. तेथे त्याच्यावर उपचार करुन पुढील उपचारासाठी त्याला कृष्णा हॉस्पीटलला दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित विवेक सुहास सत्रे, कैलास विजय माळी, पारस पिसाळ, अथर्व पिसाळ या संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.