

सातारा : करवडी, ता. कराड येथे ब्रीझा कारमध्ये तीन संशयितांकडे 3 बंदूका, मॅग्झीन व जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेवून कार, बंदूका, मोबाईल असा 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, संशयित युवक कराड परिसरातील आहेत.
कार्तिक अनिल चंदवानी (वय 19, रा. लाहोटी नगर, मलकापूर), ऋतेष धर्मेंद्र माने (वय 22, रा. कृष्णा अंगण, वाखान रोड), अक्षय प्रकाश सहजराव (वय 29, रा. लाहोटी नगर, मलकापूर सर्व ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने (एलसीबी) ही कारवाई दि. 19 रोजी केली आहे. एलसीबी पोलिसांना शामगाव घाट परिसरात कारमधील संशयितांकडे गावठी कट्टे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन शामगाव घाट ते करवडी येथे गस्त घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना ब्रीझा कार (क्रमांक एम.एच 50 एल 4289) ही संशयास्पद दिसली. पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यामध्येे संशयित तिघेजण होते व त्यांच्याकडे 3 पिस्टल, मॅग्झीन व जिवंत काडतुसे होती. पोलिसांनी पंचनामा करुन संशयितांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन संशयितांवर कारवाई करण्यात आली.