Satara Crime : ‘नाजूक’ विषयांचा पाश : नडतोय पैशांचा हव्यास

निवृत्त पोलिसाही सायबर चोरट्यांकडून गंडा
Satara Crime News
‘नाजूक’ विषयांचा पाश : नडतोय पैशांचा हव्यासAdministrator
Published on
Updated on

विठ्ठल हेंद्रे

सातारा : सातारा जिल्ह्यात सायबर फ्रॉडचा शिरकाव झाला असून यामध्ये खुद्द निवृत्त पोलिस, डॉक्टर, शिक्षक अशा क्षेत्रातील भल्याभल्या आसामी व्यक्ती अडकल्या आहेत. सायबर चोरट्यांकडून महिलांचा खुबीने वापर करत नाजूक विषयांच्या पाशाचे जाळे टाकले जात आहे. दुसरीकडे अधिक पैशांच्या हव्यासापोटी लोक स्वत:हून देखील अडकत आहेत. सायबर फ्रॉड होवू नये यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वाचकांसाठी ही वृत्तमालिका आजपासून प्रसिद्ध करत आहोत. यामुळे ऑनलाईन फसू नका अन् फसलात तर घाबरू नका.

समाजात सायबर क्राईमच्या शेकडो प्रकारच्या माध्यमातून लहान, मोठे, थोर, युवती, महिलांची फसवणूक सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाच्या हातातील मोबाईल हा त्याला कारणीभूत ठरत आहे. एकमेकांशी लोप पावत चाललेला संवाद असून प्रत्येकजण हातातील मोबाईलचा अक्षरश: बाहुला बनला आहे. येत्या काही काळात तर चोर्‍या, दरोडे याचे प्रमाण अत्यल्प होऊन गुन्ह्यांच्या संख्येत सायबर क्राईमच एक नंबरवर पोहचणार आहे. सायबर क्राईम करण्यासाठी अधिक हुशारीची गरज लागत नसून त्यासाठी मोबाईल वेड हे पुरेसे आहे. यामुळे पालकांनी आपले पाल्य मोबाईल कसा वापरत आहेत? मुले, मुली कोणत्या साईट पाहतात? मोबाईलध्ये काय सर्च करतात? आभासी दुनियेत कोणाच्या संपर्कात आहेत? यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. यासाठी पालकांनी स्वत: मोबाईल, इंटरनेट साक्षर बनने काळाची गरज बनली आहे. (क्रमश:)

डॉक्टरला नडला अधिक पैशांचा हव्यास...

सातारा जिल्ह्यातील एका डॉक्टरने पैसे गुंतवण्याची ऑनलाईन जाहीरात पाहिली. त्यानुसार सुरुवातीला 5 लाख रुपये गुंतवले. आभासी अ‍ॅपवरुन त्या डॉक्टरला गुंतवलेल्या पैशांना चांगला मोबादला मिळाला असल्याचे सायबर चोरट्यांनी अ‍ॅपवर दाखवले. यामुळे डॉक्टरने पुढे 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यावरही चांगला परतावा वाढला असल्याचे आभासी अ‍ॅपद्वारे दाखवण्यात आले. मात्र जेव्हा पैसे काढण्याची वेळ आली तेव्हा आभासी अ‍ॅपमधून पैसे निघेना. उलट संबंधित रक्कम काढण्यासाठी सायबर चोरट्यांनी 25 लाख भरावे लागतील, असे सांगितल्यानंतर सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

निवृत्त पोलिसाला डिजिटल अरेस्टचे भ्या...

सातार्‍यात नुकतेच एका निवृत्त पोलिसाला सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. बँक खात्यातून बेनामी व्यवहार झाल्याचे व्हिडीओ कॉलवर सांगून चक्क डिजिटल अरेस्ट करत असल्याचे भ्या दाखवण्यात आले. निवृत्त पोलिस देखील डिजिटल अरेस्टचा बळी ठरला व ऑनलाईन चक्क 5 लाख रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांना पाठवली. अवघ्या दोन दिवसांत सायबर चोरट्यांनी चांदी झाली. वास्तवीक डिजिटल अरेस्ट अशी संकल्पनाच अस्तित्वात नाही. मात्र व्हिडीओ कॉलवरून पोलिसांचा खाकी ड्रेस घालून धमकवण्याच्या प्रकारामुळे फसवणुकीची घडली आहे.

सेक्सॉटर्शनने मास्तरला पिळले...

सातारा जिल्ह्यातील एका शिक्षकाला अनोळखी महिलेने अश्लील व्हिडीओ कॉल करून पाशात ओढले. शिक्षकही त्यात पुरता भरकटला गेला. दोघांनी एकमेकांना नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल केले. चार दिवसांनंतर मात्र व्हिडीओ कॉल करणार्‍या महिलेने थेट दम भरत 1 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवले नाही तर अश्लील व्हिडीओ त्याची पत्नी, कुटुंबिय, मित्र यांच्या नावासह त्यांच्या मोबाईलवर पाठवणार असल्याचे सांगितले. घाबरून त्या शिक्षकाने पैसे पाठवले. तेथून पुढे पुन्हा पैशांची मागणी झाल्याने शिक्षक हादरुन गेला. अखेर पोलिसांची मदत घेतल्यानंतर पोलिसांनी धीर देत अनोळखी नंबरवरील फोन, मेसेज न वाचण्याचा सल्ला दिला. चार दिवस शिक्षकाला ब्लॅकमेल झाले. मात्र त्यानंतर धमकी येणारे फोन व मेसेज बंद झाले.

साक्षर, निरक्षर व्यक्ती सायबर क्राईमचा बळी कोणीही होऊ शकतो. क्षणीक मोहासाठी अनोळखी लिंक पाहताना व त्या ओपन करताना, अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देताना सर्व ती खबरदारी घ्यावी. यातूनही फसवणूक झाल्यास, ब्लॅकमेल होत असल्यास तक्रारदार यांनी सायबर पोलिसांची तत्काळ मदत घ्यावी. सातारा सायबर पोलिस सदैव त्यासाठी तत्पर आहेत.
तुषार दोशी, पोलिस अधीक्षक सातारा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news