सातारा : पुढारी वृत्तसेवा
खरेदी केलेल्या जमीनीचे २ कोटी ९५ लाख रुपये घेवून पसार झालेल्या संशयितांचा दुसऱ्या दिवशीही पोलिसांचा शोध सुरुच राहिला. संशयित अधूनमधून मोबाईल सुरु करत असून या लपंडावाच्या आधारे राजस्थान येथे पोलिसांचे पथक पोहचले आहे.
बन्सीलाल परमार यांनी विश्वासाने २ कोटी ९५ लाख रुपये चालक भगवतसिंग, मांगीलाल, बाबूलाल खान, गोविंद हिरागर यांना दिली होती. ती रक्कम हुबळी येथे जमीन मालकाला द्यायला सांगितले. मात्र ती रक्कम न देता संशयितांनी पोबारा केला. ही बाब समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारण सर्व रक्कम लिंब फाटा ता. सातारा येथे देण्यात आली होती. सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना शोधण्यासाठी राजस्थानसह इतर ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली. दुसरीकडे संशयितांच्या मोबाईलवर पोलिसांनी लक्ष ठेवले. त्यानुसार संशयित मोबाईल बंद-सुरु करत असल्याचे समोर आले आहे.