

बामणोली : होला पक्षाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने खटाव तालुक्यातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून मृत होला पक्षी, शिकारीसाठी वापरलेले वाहन, एअरगन, छरे आदी साहित्य जप्त केले असून, शिकारीच्या इतर गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नितीन भीमराव खरात (रा. पुसेगाव, ता. खटाव), चैतन्य मोहन लावंड, सचिन वरूण लावंड (दोघे रा. (रा. खातगुण, ता. खटाव) अशी संशयितांची नावे आहेत. वनपरिक्षेत्र बामणोली वन्यजीव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हावशी (ता. जावली) येथे होला पक्षाची शिकार झाल्याची बातमी मिळताच वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, मृत होला पक्षी, शिकारीसाठी वापरण्यात आलेली एअरगन, वाहन, छरे, छर्याची डबी व संशयितांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.