AGC Infracon: ए.जी.सी इन्फ्राकॉनला साडेतीन कोटींचा दंड

तब्बल 6903 ब्रासचे अवैध उत्खनन : कोरेगावमधील सुर्ली येथे कारनामा
AGC Infracon: ए.जी.सी इन्फ्राकॉनला साडेतीन कोटींचा दंड
(file photo)
Published on
Updated on

सातारा : सुर्ली, ता. कोरेगाव येथे संभाजीनगर जिल्ह्यातील ए.जी.सी इन्फ्राकॉन या कंपनीला प्रशासनाने 1 हजार ब्रास उत्खननाची परवानगी दिली होती. मात्र, कंपनीने तब्बल 6 हजार 903 ब्रासचे अवैध उत्खनन केले. याबाबतचा अहवाल रहिमतपूर मंडलाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. हे उत्खनन केल्याप्रकरणी ए.जी.सी इन्फ्राकॉन या कंपनीला तब्बल 3 कोटी 52 लाख 5 हजार 800 रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतचा आदेश तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी काढला आहे.

सुर्ली, ता. कोरेगाव येथील गट 209 मध्ये मोठया प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले होते. याबाबतचा अहवाल रहिमतपूर मंडलाधिकाऱ्यांनी तहसिलदार संगमेश कोडे यांना सादर केला होता. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ए.जी.सी इन्फ्राकॉन या कंपनीने तब्बल 6 हजार 903 ब्रासचे अवैध उत्खनन केल्याचे समोर आले. यानंतर तहसीलदारांनी कंपनीला लेखी खुलासा मागवला होता. यामध्ये कंपनीला मंडलाधिकाऱ्यांनी केलेला अहवाल मान्य असून त्यांनी विना परवाना उत्खनन केल्याचे एकप्रकारे मान्य केले आहे.

गट 209 मधून 1 हजार ब्रासचे उत्खनन करण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली होती. या 1 हजार ब्रासची रॉयल्टी शासनाकडे भरली आहे. मात्र, परवानगीपेक्षा तब्बल 7 पट अधिक उत्खनन कंपनीने केले आहे. हा मुरूम कंपनीने सुर्ली ते टकले यादरम्यान रेल्वे मार्गाच्या दुपदरी कामासाठी वापरला आहे. अहवालानंतर तहसिलदार संगमेश कोडे यांनी एकूण उत्खननाच्या पाच पट दंड ठोठावला आहे. अवैध उत्खनन केलेल्या 6 हजार 903 ब्रासला 4 हजार 500 रूपये प्रमाणे 3 कोटी 10 लाख 63 हजार 500, रॉयल्टी 41 लाख 41 हजार 800 आणि भूपृष्ठ भाडे 500 असा एकूण 3 कोटी 52 लाख 5 हजार 800 रूपयांचा दंड ठोठावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news