shivensdraraje vs shashikant shinde : माझ्या पराभवाला शिवेंद्रराजेच जबाबदार : आ. शशिकांत शिंदे | पुढारी

shivensdraraje vs shashikant shinde : माझ्या पराभवाला शिवेंद्रराजेच जबाबदार : आ. शशिकांत शिंदे

सातारा : पुढारी वृत्तसेवा

shivensdraraje vs shashikant shinde : सातारा जिल्हा बँकेतील माझ्या पराभवासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले हेच जबाबदार आहेत. माझ्या मतदारांना ऊस न नेण्याच्या त्यांनी धमक्या दिल्या. त्यांनीच गुंडगिरी, दडपशाहीच्या माध्यमातून निवडणूक केली. मतदारांना गोव्यापासून तिरूपती, म्हैसूर, उटी, विशाखापट्टणम, गणपतीपुळे या ठिकाणी नेले होते.  त्या प्रत्येक ठिकाणी मी पोहोचलो होतो. मनात आणले असते तर सर्वच्या सर्व मतदार उचलून ताब्यात  घेवून आलो असतो.

मात्र हे माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या चौकटीबाहेर जायचे नव्हते. भविष्यात पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील आमदारांचे संख्याबळ का घटले? याचा विचार करावा, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी पराभवावर भाष्य केले.

shivensdraraje vs shashikant shinde : मी राजा नसल्याने बिनविरोध होवू शकलो नाही

शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना आ. शशिकांत शिंदे यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर थेट आरोप केले. मी राजा नसल्यामुळे बिनविरोध होवू शकलो नाही असे सांगून आ. शिंदे म्हणाले,  रांजणे व माझ्यामध्ये समेट घडवण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातत्याने बैठका घेण्याची आश्वासने दिली.  मात्र, ही बैठक सुध्दा 10 ते 15 दिवस लांबवली. त्याचवेळी मला शंका आली होती.

मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत पॅनलचे प्रमुख आणि त्यांची आमची बैठक होवून प्रयत्न करायचे खोटे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे माझी फसगत झाली. मला पहिल्यावेळीच सांगितले असते की जमणार नाही, आम्ही  सहकार्य करणार नाही.

मला माझ्या कार्यकर्त्याबरोबर रहावे लागेल असे अगोदरच सांगितले असते तर  ते मला निश्चितपणाने पटले असते.

त्यामुळेच मला पराभवाला सामोरे जावे लागले

परंतू चर्चेची द्वारे एका बाजूला चालू ठेवायची आणि दुसर्‍या बाजूला फूस लावायची हे धोरण आ. शिवेंद्रराजेंनी अवलंबले. त्यामुळेच मला पराभवाला सामोरे जावे लागले.

पराभवानंतर पडद्याच्या मागे असणारे आ. शिवेंद्रराजे पुढे आले.

अगदी नृत्यात सहभागी झाले. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघितला तर या कटाचा सूत्रधार कोण? हे निश्चितपणे सर्वाना कळाले आहे.

ते म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत माझा गाफीलपणा नडला. खा. शरद पवार यांनीसुध्दा आ. शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचे वक्तव्य केले असून  ही वस्तूस्थिती आहे.

मी सरळमनाचा राजकारणी

मी सरळमनाचा राजकारणी आहे. मनात एक आणि तोंडावर एक करण्याची भूमिका माझी कधीही नसते.

मतदान केंद्रावर सुध्दा मी  हसत खेळत  निवडणूक केली. उलट माझ्यावरच गुंडगिरीचा आरोप केला.

वास्तविक गुंडगिरी, दडपशाहीच्या माध्यमातून त्यांनीच निवडणूक केली.

मतदार ज्या ज्या ठिकाणी नेले तेथे मी सर्वत्र पोहोचलो होतो.

मनात आणले असते तर सर्वच्या सर्व मतदार उचलून ताब्यात घेवून आलो असतो, असेही आ. शिंदे म्हणाले.

Back to top button