जावली पुन्हा कावली; शिवेंद्रराजे शशिकांत शिंदे संघर्ष भविष्यात उफाळणार | पुढारी

जावली पुन्हा कावली; शिवेंद्रराजे शशिकांत शिंदे संघर्ष भविष्यात उफाळणार

कुडाळ (सातारा) : पुढारी वृत्तसेवा

पंधरा दिवस मी काय आजारी पडलो आणि सगळं उलट झालं काही लोकांनी गडबड केली. त्यामुळे दोष कोणाला द्यायचा? शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले. मात्र त्याला म्हणावे असे यश आले नाही, असे सांगत आमदार शशिकांत शिंदे यांनी नकळत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या केलेल्या प्रयत्नावर नाराजी व्यक्त केली. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारले असता शिवेंद्रराजे म्हणाले जावळी तालुक्यात नेमकं काय चाललं आहे. याबाबत अद्यापही मला माहिती मिळाली नाही. मात्र शशिकांत शिंदे यांची ही निवडणूक त्यांची आहे. त्यावर मला भाष्य करता येणार नाही. निवडणूक त्यांची यावर भाष्य करणे योग्य नाही, असे सांगत शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळी तालुका सोसायटी मतदार संघाच्या झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सपशेल हात झटकले.

दोन्ही जावळीच्या आजी-माजी नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे या निवडणूक प्रक्रियेमधील असणारी परस्परांमधील दरी दिसून आली. यानंतर देखील आता निकाल बाहेर आल्यानंतर बऱ्याच गोष्टीचा उलगडा होणार आहे. त्यामुळे या प्रतिक्रियेनंतर राजकीय गणिते आणि समीकरणे आगामी काळात दोन्ही नेत्यांना ठरवावी लागणार हे मात्र सत्य.

Back to top button