पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ते आज (दि. 18) सकाळी साताऱ्यात गेले. मेढ्यात बाजार चौक तर वाईतील छ. शिवाजी महाराज चौकात सभेतूनही त्यांची तोफ धडाडली. यानंतर त्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, "मी आजपर्यंत अंतर दिलेलं नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. (Maratha Reservation )
जरांगे-पाटील यांनी उदयनराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंशी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. यावेळीते माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सर्वांनी अंतकरणातून विचार करायला हवा. समाजात जातीजातीत तेढ निर्माण करू नका. काय बोलायचं? सर्वांनीच विचार करण्याची गरज आली आहे. या देशाचे तुकडे करू नका. अशी हात जोडून उदयनराजे यांनी कळकळीची विनंती केली."
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण केले. यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरू केले आहे. तसेच काही ठिकाणी दाखले वाटपही सुरू झाले आहे. पण सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला दि. २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे- पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे सुरू करून मराठा समाजात जागृती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात तिसर्या टप्प्यातील दौरा सुरू झाला आहे. दि. १५ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत हा तिसरा टप्पा सुरू राहणार आहे.
हेही वाचा