SDCCB Election : विरोधी पॅनेलच्या उमेदवारांची माघार | पुढारी

SDCCB Election : विरोधी पॅनेलच्या उमेदवारांची माघार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या तासाला खा. रणजितसिंह ना. निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांनी अर्ज काढत माघार घेतली. त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माघार घेतली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पॅनेल तयार करण्याची घोषणा आ. जयकुमार गोरे यांनी केली होती. त्यानुसार खा. रणजितसिंह यांनी मजूर सोसायटी, आ. गोरे यांनी अर्ज दाखल केले होते. त्याचबरोबर ओबसी, फलटण सोसायटी, विमुक्त भटक्या जाती मधून समर्थकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनतर माघारीच्या कालावधीत बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी खा. रणजितसिंह, आ. गोरे यांच्यासह समर्थकांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे आता बँकेत विरोधी पॅनेल उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Back to top button