SDCCB : सातारा जिल्हा बँकेसाठी खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध | पुढारी

SDCCB : सातारा जिल्हा बँकेसाठी खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेसाठी खा. उदयनराजे भोसले आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खा. उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात ना. रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतली.

तर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले. त्यानंतर दोन्ही राजे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

Back to top button