…तर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर शिमगा : सदाभाऊ खोत | पुढारी

...तर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर शिमगा : सदाभाऊ खोत

कराड; पुढारी वृत्तसेवा

एकरकमी एफआरपीसाठी आज (सोमवार) रयत क्रांती संघटनेच्या वतीने कराड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आमदार सदाभाऊ खोत, सचिन नलावडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली नाही तर त्यांच्या घरासमोर लेकरा बाळासह शिमगा करणार असल्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.

बहुजन समता पार्टीने या मोर्चास पाठिंबा दिला होता. कृष्णा कॅनॉल येथून मोर्चास प्रारंभ झाला. तालुक्‍यातील सुमारे पन्नास ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा कृष्णा कॅनॉल येथून कृष्णा नाका बस स्थानकाच्या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आ. सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. बहुजन समता पार्टीचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, तालुकाध्यक्ष अशोक लोहार यांच्याकडे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Back to top button