सातारा : महामार्गावर ‘द बर्निंग’ एसटी - पुढारी

सातारा : महामार्गावर ‘द बर्निंग’ एसटी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता उडतारे गावच्या हद्दीत चालत्या एसटीने पेट घेतल्याने खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, पुणे दिशेने एसटी निघाली होती. अचानक वाहनातून धूर येऊ लागल्याने चालकाने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत एसटीने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की एसटी जळून भस्मसात झाली. या सर्व घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. एसटी मधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

Back to top button