Satara : सातार्‍यात कोयता गँगचा राडा; दोघांना अटक | पुढारी

Satara : सातार्‍यात कोयता गँगचा राडा; दोघांना अटक

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात दोन ठिकाणी सुमारे 5 जणांच्या कोयता गँगच्या टोळक्याने हातात कोयता नाचवत राडा केला. सर्वसामान्यांवर कोयता उगारुन लुटमारीचा प्रकार केल्याने पोवई नाका हादरुन गेला. यावेळी गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला असता तेही जखमी झाले. दरम्यान, दोघांना ताब्यात घेतले असून इतर संशयित पळून गेले.

विनायक मनवी असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना सोमवारी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे पाच जणांच्या टोळक्याने पोवई नाक्यावरील सयाजी हायस्कूलसमोर राडा करण्यास सुरुवात केली. काही हुल्लडबाज युवक बेधडकपणे मुख्य रस्त्यालगत आरडाओरडा करत वाहना चालकांना हुसकावत होती. सुमारे 5 ते 10 मिनिटे संशयित युवकांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर पोवई नाक्यावरीलच डीसीसी बँकेच्या समोर पुन्हा टोळीने राडा केला. यावेळी संशयितांना पोलिसांनी पकडले.

हेही वाचा

Back to top button