जेजुरीत आ. शिवेंद्रराजेंनी उंचावली महातलवार; हिंदू जनआक्रोश मोर्चा | पुढारी

जेजुरीत आ. शिवेंद्रराजेंनी उंचावली महातलवार; हिंदू जनआक्रोश मोर्चा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील जेजुरीत हिंदू जनजागृती आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. साताऱ्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जेजुरी गडावरील ४२ किलो वजनाची महातलवार उंचावून या मोर्चाचा प्रारंभ केला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राज्यात ठिकठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा निघत आहे. जेजुरी गडावरही गुरूवारी असा मोर्चा आयोजित केला होता. त्याचा प्रारंभ आ. शिवेंद्रराजे भोसले व हिंदू जनजागृती राज्य संघटक विक्रम पावसकर यांनी केला. आ. शिवेंद्रराजे यांनी खंडोबा देवदर्शन घेत आणि जेजुरी गडावरील ४२ किलो वजनाची महा तलवार उंचावल्यानंतर या मोर्चाची सुरूवात झाली. भंडाऱ्याची उधळण व भारतमातेचा जयघोष करत सवाद्य असा भगवामय झालेला जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधक ठरत होती. यावेळी धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गो हत्या विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू व्हावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांच्यावतीने करण्यात आली.

Back to top button