शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या बंगल्यात चोरी | पुढारी

शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या बंगल्यात चोरी

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरनजीकच्या वरची रांजणवाडी परिसरातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या बंगल्यातून अंदाजे अडीच लाखांचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबतची तक्रार महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

घाडगे यांच्या बंगल्याचे रिपेअरिंगचे सुरू असलेले काम पाहण्यास ते नेहमीप्रमाणे गेले असता त्यांना बांधकामासाठी आणलेले आरमाड केबल, कटर मशीन, ड्रिल मशीन आदी साहित्य दिसले नाही. याबाबत त्यांनी कामगारांना विचारले मात्र, त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले.

बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूची खिडकीही त्यांना उघडी दिसली. बंगल्यातूनही प्लंबिंग साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर यशवंत घाडगे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास सपोनि भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस करत आहेत.

Back to top button