कास पठार : ३०० फूट दरीत युवक कोसळला, रेस्क्यू फोर्सने वाचवले | पुढारी

कास पठार : ३०० फूट दरीत युवक कोसळला, रेस्क्यू फोर्सने वाचवले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कास पठार परिसरात फिरायला गेलेला युवक ३०० फूट दरीत कोसळला. दरम्यान कास पठार परिसरात त्या युवकाला वाचवण्यासाठी मोठी शोधाशोध करण्यात आली. यावेळी रेस्क्यू फोर्सने अथक प्रयत्न करत त्याला वाचवले.

सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील युवक कास रस्त्यावरील गणेश खिंडीतून सुमारे ३०० फूट दरीत पडला. ही घटना गुरुवारी घडल्यानंतर शुक्रवारी शोध मोहिम करुन त्याला शोधले असता गंभीर जखमी अवस्थेत सापडला. तात्काळ त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभर झालेल्या थरारक घटनेने परिसर हादरुन गेला आहे. कनिष्क जांगळे (वय २२, रा. यादोगोपाळ) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, कनिष्क जांगळे गुरुवारपासून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय त्याचा शोध घेत होेते. सर्वत्र त्याचा शोध घेतल्यानंतरही तो साडपत नव्हता. शुक्रवारी सकाळी कनिष्कची दुचाकी कास रस्त्यावरील गणेश खिंड परिसरातील खोल दरीनजीक सापडली. तसेच चप्पल व इतर साहित्य होते. यावरुन तात्काळ शोध मोहिम घेण्यास सुरुवात केली.

मात्र खोल दरी, पावसाचा तडाखा यामुळे शोध मोहिमेला अडथळा येवू लागला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तात्काळ ट्रेकर्स, क्रेन पाचारण करण्यात आली. अखेर शुक्रवारी सायंकाळी गंभीर जखमी अवस्थेत युवकाला बाहेर काढण्यात यश आले.

पाहा : आम्ही शब्दवारीचे वारकरी…वारीमहात्म्य सांगतायत डॉ. सदानंद मोरे 

Back to top button