सातारा-पुणे जुन्या कात्रज घाटात एकेरी वाहतूक | पुढारी

सातारा-पुणे जुन्या कात्रज घाटात एकेरी वाहतूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कात्रज शिंदेवाडी रस्ता मार्ग क्र.१२६ (जुना कात्रज घाट) कि. मी. १२/०० ते २०/२०० या लांबीत घाट रस्त्याचे डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता ब. नि. बहिर यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहनधारकांनी सातार्‍याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता बहिर यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button