सातारा : मंगलप्रभात लोढा यांच्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना! | पुढारी

सातारा : मंगलप्रभात लोढा यांच्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!

पाचगणी (सातारा), पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली आहे !

औरंगजेबाने शिवरायांना रोखलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला आहे.

किल्ले प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी भाषणात मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले; पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले, असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी सेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली.

हेही वाचा 

Back to top button