सातारा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 382 अर्ज | पुढारी

सातारा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 382 अर्ज

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी 80 तर सदस्यपदासाठी 302 असे एकूण 382 उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाले. जिल्ह्यात दोन दिवसांत सरपंचपदासाठी 102 तर सदस्यपदासाठी 334 असे एकूण 436 उमेदवारी अर्ज दाखल झाले.

मंगळवारी अर्ज दाखल करणार्‍या इच्छुकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. सातारा तालुक्यातून सरपंचपदसाठी 4 तर सदस्यपदासाठी 27 अर्ज, कराड तालुक्यातून सरपंच पदासाठी 26 तर सदस्यपदासाठी 87 अर्ज, पाटण तालुक्यातून सरपंच पदासाठी 20 तर सदस्यपदासाठी 82, कोरेगाव तालुक्यातून सरपंचपदासाठी 10 व सदस्यपदासाठी 55 अर्ज, वाई तालुक्यातून सदस्यपदासाठी 4 अर्ज, खंडाळा तालुक्यात सदस्यपदासाठी 8 अर्ज, जावली तालुक्यातून सरपंच पदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 10 अर्ज, माण तालुक्यातून सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 3 अर्ज, खटाव तालुक्यातून सरपंच पदासाठी 1 तर सदस्यपदासाठी 3 अर्ज दाखल झाले आहेत. वाई, खंडाळा तालुक्यातून सरपंचपदासाठी तर महाबळेश्वर तालुक्यातून सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. दिवसभरात सरपंचपदासाठी 80 तर सदस्यपदासाठी 302 अर्ज दाखल झाले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूल उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुकांना 2 डिसेंबरपर्यंत उमेवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज सादर करण्यासाठी तीनच दिवसांची मुदत रहिली आहे. सातारा जिल्ह्यात बुधवारी शिवप्रताप दिनानिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायत निवडुकीचे अर्ज भरुन घेतले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा

Back to top button