साताऱ्यात नगरसेवक भिडले; माजी नगरसेविकेला मारहाण करत विनयभंग | पुढारी

साताऱ्यात नगरसेवक भिडले; माजी नगरसेविकेला मारहाण करत विनयभंग

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरात आज (बुधवार) पहाटे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी माजी नगरसेविका असलेल्या महिलेला मारहाण करत त्यांचा विनयभंग केला. यावेळी महिलेचे पतीही तेथे होते. सातारा नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी वॉर्डात काम करत असताना हा राडा झाला असून, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, आज सकाळी पालिकेचे कर्मचारी यादो गोपाळ पेठेत रांगोळी काढण्याचे काम करत होते. यातूनच स्वच्छता व रांगोळी काढणे यावरून जांभळे यांच्यासह दुसऱ्या माजी नगरसेवका यांच्यामध्ये वाद सुरू झाला. यावेळी माजी महिला नगरसेविका यांनीही घटनास्थळी धाव घेतली व वाद थांबण्याचा प्रयत्न केला असता, जांभळे यांनी माजी नगरसेविका राहिलेल्या महिलेला मारहाण करत विनयभंग केला.

या सर्व घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन जांभळे यांच्या विरुद्ध तक्रार दिली. दरम्यान जांभळे हे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक असून, विरुद्ध पार्टीचे माजी नगरसेवक दाम्पत्य खा. उदयनराजे भोसले गटाचे आहेत.

हेही वाचा :  

Back to top button