सातारा : महिला व युवतींसाठी गरबा व रास दांडिया कार्यशाळा | पुढारी

सातारा : महिला व युवतींसाठी गरबा व रास दांडिया कार्यशाळा

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व एबीसीडी डान्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवतींसाठी दि. 1 ते 3 ऑक्टोबर या कालावधीत दररोज दु. 2 ते 4 या वेळेत मोती तळे, राजवाडा येथे गरबा व रास दांडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे विविध सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महिला व युवतींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नवरात्रौत्सवानिमित्त ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पहिले दोन दिवस तज्ञ कोरिओग्राफर्सकडून महिलांना गरबा व रास दांडियाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांसाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी 2 ते 4 यावेळेत गरबा व रास दांडिया स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सहभागींमधून गरबा क्वीन, दांडिया क्वीन, प्रॉपर कॉश्च्यूम असे तीन विजेते निवडून त्यांना श्रीशा कॉस्मेटिकतर्फे आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी फक्त कस्तुरी सभासदांना मोफत प्रवेश असून इतर महिला व युवतींना 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 8104322958 येथे संपर्क साधावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे केले आहे.

कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरूच…

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबची नवीन वर्षातील सभासद नोंदणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सभासद होणार्‍या महिलांना आकर्षक भेटवस्तू मिळत असून वर्षभर विविध कार्यक्रमांचा खजाना उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये भरपूर लकी ड्रॉ, भेटवस्तू व बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. ज्या महिला व युवतींनी अद्याप सभासदत्व घेतले नाही, त्यांनी सभासद नोंदणीसाठी दै. ‘पुढारी’ कार्यालयात सकाळी 11 ते सायं.6.30 या वेळेत 8104322958 नंबरवर संपर्क साधावा.

Back to top button