सातारा : 94 गावच्या पाणी योजनांना निधी; जलजीवन मिशनतंर्गत मान्यता | पुढारी

सातारा : 94 गावच्या पाणी योजनांना निधी; जलजीवन मिशनतंर्गत मान्यता

कराड; पुढारी वृत्तसेवा :  खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील म्हावशी, जिंती, सडावाघापूर, चाफळ यासह एकूण 94 गावांतील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली आहे. या गावातील पाणी योजनांसाठी निधी उपलब्ध झाल्याने त्या कामांना गती मिळणार आहे.

जलजीवन मिशन योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये म्हावशी येथे 4 कोटी 29 लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. तसेच यासह केरळ, आंबळे, आंबवडे खुर्द, अस्वलेवाडी, अंबवणे, बहुले, दिवशी बुद्रुक, कोरिवळे, टेळेवाडी, निसरे, बनपुरी, चाळकेवाडी, चाफोली, चाफळ, दाढोली, डांगिष्टेवाडी, धायटी, जुंगटी, गाढवखोप, गलमेवाडी, गमेवाडी, घाणव, गोषटवाडी, वाघणे, जिंती (मोडकवाडी), काहीर या गावांसाठी निधी प्राप्त झाल आहे.

कळकेवाडी, लोटलेवाडी – काळगाव, येळेवाडी – काळगाव, बोपोली, ढाणकल, घाटमाथा, जिंती-सावंतवाडी, मणेरी, भरेवाडी – काळगाव, केळोली, कोळेकरवाडी, कोंजवडे, मान्याचीवाडी, कुसरुंड, कुठरे, मणदुरे, पाडळोशी, रूवले, सातर, शिद्रुकवाडी, तोंडोशी, विरेवाडी, मुरुड, धनगरवाडी, कोळगेवाडी व मुटलवाडी, चव्हाणवाडी, डाकेवाडी, मराठवाडी, कळंबे, नेचल, खिवशी, जांभुळवाडी या गावांनाही निधी प्राप्त झाला आहे.

तसेच ढेबेवाडी, डिगेवाडी, ताईगडेवाडी, किल्ले मोरगिरी, वायचळवाडी, पाठवडे, सडावाघापूर, साईकडे, सणबूर, शितपवाडी, सुपुगडेवाडी, बिबी, येरफळे, साखरी, धामणी, धडामवाडी, जिंती तसेच डोंगळेवाडी, गुंजाळी, काळगाव-लोहारवाडी, कसणी, कवडेवाडी, महिंद, मेंढोशी, भोसगाव, बेलवडे खुर्द, गोकुळ तर्फ हेळवाक, ताईगडेवाडी, कळकेवाडी, कळंबे, लोटलेवाडी, येळेवाडी, बीबी आदी गावातील पाणी योजनांचा समावेश आहे.

सांगता येईना अन् सहनही होईना

स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या समस्या पुरवठा विभागाकडून सोडवल्या जात नाहीत. पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे एखादी तक्रार खासगीत बोलतात. पण वरिष्ठांकडे भीतीपोटी बोलत नाहीत.

Back to top button