सातारा : येरवडा जेलमधून खंडणीची मागणी

file photo
file photo
Published on
Updated on

लोणंद, पुढारी वृत्तसेवा : लोणंद येथील व्यापारी अमित तापडिया यांना कुख्यात गुंड परवेज हनिफ शेख याने येरवडा जेलमधून पत्र पाठवत चक्क 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परवेज शेख याच्या विरोधात लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, परवेज शेख हा कुख्यात गुन्हेगार असून तो सध्या येरवडा जेलमध्ये आहे. त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोणंद येथील प्रसिद्ध व्यापारी अमित तापडिया यांना स्पीड पोस्टने मंडल तुरंगाधिकारी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे 08 यांच्या सही-शिक्क्याने परवेज हनिफ शेख येरवडा मध्यवर्ती कारागृह हॉस्पिटल विभाग सेप्रेट 7 रु.नं. 10 पुणे 06 याने लिफाफा पाठवल्याचे समोर आले आहे.

व्यापार्‍याने लिफाफा उघडून पाहिला असता तो लिफाफा परवेज शेख याने पाठवला होता. त्यात असे म्हटले आहे की, लोणंद येथील 27 एकर जमीन आहे. तिची किंमत 30 सीआर एवढ्या रकमेची आहे. त्या जमिनीवर अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. या जमीनीचे काम अधिकृतपणे करण्यासाठी मला 50 लाख रूपयांची गरज आहे. ते पैसे तू मला देणार आहे. तुझ्याकडे भरपूर रुपये आहेत. त्यातील थोडीफार रक्कम मला दिली तर तुला काही फरक पडणार नाही.

सद्या मी व दोन साथीदार असे तिघेजण एकत्र आहोत. मागितलेली रक्कम ही चेष्टेवारी घेवू नको, मला पैशाची गरज आहे हे लक्षात ठेव व तुझा निर्णय वकीला मार्फत माझ्याकडे पाठव, अशा मजकुराचे पत्र परवेज शेखने हिंदी भाषेत लिहीले आहे. हे पत्र वाचल्यानंतर आपल्या जिवीतास धोका होण्याची शक्यता असल्याने अमित तापडिया यांनी लोणंद पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी परवेज हनिफ शेख याच्या विरुद्ध लोणंद पोलिसात तक्रार दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news