सातारा : कास पठारावरील बांधकामे नियमित न केल्यास आंदोलन : आ. शिवेंद्रराजे भोसले (Video)

सातारा : कास पठारावरील बांधकामे नियमित न केल्यास आंदोलन : आ. शिवेंद्रराजे भोसले (Video)
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कास पठार परिसरात स्थानिकांनी स्वत: च्या जागेत बांधकामे केली असून उदरनिर्वाहासाठी त्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे या बांधकामांवर कारवाई करू नये, तसेच ही बांधकामे कायम करावीत अन्यथा स्थानिक कुटुंबांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा असा इशारा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कास पठार परिसरातील स्थानिकांनी केलेली बांधकामे परवानगी घेतली नाही म्हणून बेकायदेशीर होऊ शकत नाहीत. त्यांनी स्वमालकीच्या जागेत बांधकामे केली आहेत. ही बांधकामे नियमित करावीत अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. सरसकट बांधकामांवर कारवाई झाल्यास त्याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बांधकामांवर कारवाई करू नये. बांधकामे नियमित न केल्यास स्थानिक कुटुंबाना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news